अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके (Nilesh Lanke) हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज निलेश लंके यांनी लिहीलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाश होणार आहे. मात्र पक्षप्रवेशाबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाहीये. माझ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील त्याचा उल्लेख नाही. लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक असते, त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय ते ठरवू असं लंके म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त
Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल