दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

505 0

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आम्हाला त्रास दिला म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देणार, असा प्रकार मविआ सरकारकडून सध्या सुरू आहे. त्यामुळे एका व्हिडिओ बॉम्बमुळे इतकी चिडीचूप झाली आहे. त्यामुळे दुसरा व्हिडिओ बॉम्ब तर याहून स्ट्रॉंग असून दोन दिवसांतच नवा व्हिडिओ बॉम्ब फोडणार असल्याचं पाटील यांनी सांगितले 

घाबरवण्याचा प्रयत्न सुरू असला त्रू घाबरणारे लोक आम्ही नक्कीच नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. फडणवीसांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. मुख्यमंत्रीपदी असताना चांगल काम केल्यानेच सगळी जनता देवेंद्रजींच्या सोबत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीपुण्यात पत्रकाराशी बोलताना दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले,फोन टॅपिंग प्रकरणात कोणाचा समावेश आहे.याची खोलात जाऊन चौकशी करण्याएवजी देवेंद्रजी जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांची चौकशी होत आहे. ज्यांना माहितीचा स्त्रोत कायद्याप्रमाणे विचारता येत नाही.

त्यांना चौकशीला बोलावले आहे की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली. लोकशाहीत सत्ताधारी पक्षावर अंकुश मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेत्याच्या पदाची निर्मिती झाली.

लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांच्या समांतर महत्व मिळाले. त्याला माहिती कुठून मिळते हे जर तो सांगायला लागला, तर तो सत्ताधाऱ्यांची प्रकऱणे उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला माहिती कुठून मिळते हे विचारायचे नसते. पण मविआ सरकारमध्ये अंधेरी नगरी चौपट राजा कारभार चाललेला आहे. त्यामुळे मविआचा पाय खोलात आहे. असे पाटील म्हणाले.