modi and nitish kumar

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

687 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक निकालानंतर एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एनडीएने नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली. एनडीएच्या नेत्यांची बुधवारी बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएत जेडीयूच्या नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे 12 खासदार असून त्यांनी तीन मंत्रालयांची मागणी या बैठकीत केली आहे.

कोणत्या मंत्रालयाची केली मागणी
नितीश कुमारांना रेल्वे, कृषी आणि वित्त ही तीन मंत्रालये हवी आहेत. ज्यात रेल्वे मंत्रालय हे नितीश कुमार यांना प्राधान्याने हवे आहे. पक्षाला रेल्वेची गरज आहे कारण नितीश कुमार याआधी रेल्वेमंत्री होते. रेल्वे मंत्रालय हा एक असा विभाग आहे जो जनतेशी संबंधित आहे. या मंत्रालयाशी अधिकाधिक लोक जोडले जाऊ शकतात. जेडीयूकडून तीन मंत्रालयांची मागणी केली गेली असली तरी एनडीएच्या बैठकीत काय निर्णय होणार? यावर सर्व अवलंबून आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Share This News
error: Content is protected !!