Sharad Pawar Shirur

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

627 0

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली.

या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!