Breaking News
Ajit Pawar

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

363 0

पुणे : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. यादरम्यान आता उत्तर पुणे जिल्ह्यात वादा तोच..! पण .. दादा नवा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरमुळं उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादाची जागा रोहित पवार घेत आहेत का? या चर्चा रंगल्या आहेत.

‘वादा तोच…! पण दादा नवा’ ही टॅगलाइन देऊन रोहित पवारांचे बॅनर पुणे नाशिक महामार्गावर झळकले आहेत. याचे कारणही तसंच आहे. बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी शरद पवारांची मंचर येथे सभा होणार आहे. या सभेसाठी मी येतोय असा संदेशदेखील दिला जातोय. तर, दुसरीकडे वादा तोच पण दादा नवा अशी टॅगलाइनचे बॅनर झळकल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळं पुण्याच्या दादाची जागा आता रोहित पवार घेत आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Share This News
error: Content is protected !!