NCP LAKHAN BENADE NEWS: कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा अमानुष खून करून दोन तुकडे करून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली असून या हत्येमागचं मूळ कारणही आता स्पष्ट झालंय.
अनैतिक संबंधातील महिलेच्या सांगण्यावरूनही हत्या झाली आहे.
KOLHAPUR ROAD NEWS :रस्त्याअभावी बैलगाडीतून वृद्ध महिलेला पोहचवले रुग्णालायात..! #kolhapurnews
लखन बेनाडे (LAKHAN BENADE) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
बेनाडे हा हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचा ग्रामपंचायत सदस्य होता.
त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून त्याचं गुन्हेगारांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये ही वजन होतं.
तो मूळचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून पक्षात फूट पडल्यानंतर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेला.
गुन्हेगारी आणि राजकारण एकत्रच सुरू असल्यानं तो कायमच वादग्रस्त राहिला. बचत गटाच्या माध्यमातून त्याने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
लैंगिक अत्याचाराच्या एका गुन्ह्यात पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असताना तो अचानक शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करताना दिसला होता.
त्यावेळी त्याची मोठी चर्चाही झाली. हाच बेनाडे आठ दिवसांपासून बेपत्ता होता. त्याची बहीण नीता उमाजी तडाखे यांनी कोल्हापूरच्या गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
या दरम्यान बेनाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असून गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं निष्पन्न झालं.
त्याचं अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
त्यावेळी लक्ष्मी विशाल घस्ते या महिलेशी बेनाडे याचे वाद सुरू होते.
हे दोघेही एकमेकांना विरोधात रील्स बनवून वायरल करत होते. बेनाडे याची शेवटची पोस्ट नऊ जुलैची होती.
त्यामुळे पोलिसांनी लक्ष्मीच्या नवऱ्याचा शोध घेतला. त्याला बेनाडे विषयी विचारल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली.
मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच पत्नीच्या सांगण्यावरून बेनाडेचं सायबर चौकातून अपहरण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली.
बेनाडेला जबरदस्तीने कार मध्ये बसवून कर्नाटकच्या दिशेनं नेण्यात आलं.
वाटेतच त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे दोन तुकडे करून ते हिरण्यकेशी नदीत संकेश्वरजवळ फेकून दिल्याची माहिती दिली.
त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं मृतदेहाचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे या प्रकरणात लक्ष्मी विशाल घस्ते, आकाश उर्फ माया दिपक घस्ते, संस्कार महादेव सावर्डे, अजित उदय चुडेकर यांना अटक केली असून
त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. ज्यामधून या गुन्हाच मूळ कारण देखील समोर आलंय.
लखन बेनाडे याने बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचा लैंगिक आणि मानसिक छळ केला होता. त्याच पद्धतीने विशाल घस्ते याची पत्नी लक्ष्मी देखील बेनाडे याची शिकार ठरली. विशाल दोन वर्षांपूर्वी तुरुंगात होता. त्यावेळी त्याची पत्नी लक्ष्मी हिने बेनाडे कडे बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मागितलं. त्यावेळी तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत बेनाडेने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर तिलाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्याने लक्ष्मीला त्याच्याबरोबर त्याच्याच घरी ठेवून घेतलं. ज्यावेळी विशाल घस्ते तुरुंगातून बाहेर आला त्यावेळी त्याची लक्ष्मी पुन्हा त्याच्याकडे राहायला गेली. ज्यामुळे बेनाडेने या पती-पत्नी विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्या. 10 जुलैला त्यानेच लक्ष्मीला बोलावून घेतलं, सगळ्या तक्रारी मागे घेतो फक्त तू माझ्याबरोबर चल असं तिला सांगितलं. मात्र लक्ष्मीने आपल्या पतीलाही तिथे बोलावून घेतलं. त्यावेळी बेनाडेने लक्ष्मीला मारहाण केली व तिथून निघून गेला. त्यामुळेच लक्ष्मीने विशालला बेनाडेचा काटा काढायला सांगितलं. त्यानुसार विशाल आणि त्याच्या साथीदारांनी मिळून बेनाडेचा पाठलाग केला. त्याला तवेरा गाडीमध्ये जबरदस्ती बसवून अपहरण केलं. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह जाळून त्याचे दोन तुकडे करून नदीत फेकून दिले. थोडक्यात हे सगळेच हत्याकांड अनैतिक संबंधातून झालं. बेनाडे याने अनेक महिलांचा छळ केल्यामुळे त्याच्या बाबतीत हे सगळं घडलं, अशा प्रतिक्रिया आता सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.