मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवारांनी राजीनामा दिला, पण त्यांनी नंतर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना वाय.बी.चव्हाण सेंटरवर घोषणा देण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठवायला सांगितलं, असा आरोप अजित पवार यांनी केला. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
‘राष्ट्रवादी कुणाची हे सुप्रीम कोर्टात बाकी आहे. कोणाला विचारून आंदोलन जितेंद्र आव्हाडने केलं नाही आणि करणारही नाही. राज्यात कुणालाही विचारलं तर कुणीही सांगेल खरी राष्ट्रवादी शरद पवारांची आहे. माझं आंदोलन शरद पवारही अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलो नाही,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तसेच ‘बोलताना मर्यादा बाळगा, अजित पवारांनी शरद पवारांवर बोलावं हे कलयुग आहे. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता. यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, शरद पवार त्यांना अडसर ठरत होते. तुम्ही कुणीही मोठे झालात तरी तुमचा निर्माता शरद पवारच हे अख्ख्या जगाला माहिती आहे,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला आहे.
‘शरद पवारांबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत, मी कुणाशी चर्चा केली नाही, ना कुणाला भेटलो. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. तुम्ही शरद पवारांना घाबरवायला जाता, बस करा हे बालीश राजकारण,’ अशी टीकादेखील जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू
World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?
Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर
Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Kidney Problem : किडनीच्या रुग्णांनी चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका; अन्यथा होईल गंभीर आजार