मोदींच्या विरोधात काँग्रेसचे राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

224 0

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार आहे. भाजपच्या कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.

नाना पटोले यांनी सांगितले की,उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत. हातात फलक घेऊन ‘मोदी माफी मागो’ अशी मागणी करणार आंदोलन करण्यात येईल. तुम्ही पंतप्रधानांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचं समर्थन करणार असाल तर तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात, असाही पटोले यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

‘… आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, काय आहे या पत्रात ?

Posted by - May 10, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. एकूणच राज्यात या मुद्द्यावरून…

#तू झूठी में मक्कार : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचं नवं गाणं ‘शो मी द थुमका’ रिलीज VIDEO SONG

Posted by - February 21, 2023 0
मनोरंजन : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार‘ या चित्रपटातील ‘शो मी द ठुमका’ हे…

PUNE : बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपशहरप्रमुख पदी निलेश माझिरे यांची नियुक्ती

Posted by - January 17, 2023 0
पुणे : निलेश माझिरे यांची आज बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे व पुणे शहर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *