राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून; 6 दिवस चालणार प्रत्यक्ष कामकाज

150 0

मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार आहे.

विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या सत्तांतरावरून आणि होत असलेल्या टीकेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येऊ शकतात. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनात ही चर्चेत राहण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्याने गेल्या मंत्रिमंडळात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता सत्तेची चाकं फिरली आणि एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यानंतर संजय राठोड, अब्दुल सत्तार अशा आरोप असणाऱ्या मंत्रांनाही मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यावरून विरोधकांनी आतापासूनच टीकेची झोड उडवलेली आहे. हेच मुद्दे येत्या अधिवेशनातही चांगलेच गाजू शकतात. मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. हाही मुद्दा येत्या अधिवेशनात विरोधकांकडून उचलून धरला जाणार आहे, त्यामुळे सरकारवर कडाडून टीका होत आहे.

दरम्यान, नव्या सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात राज्यातल्या सत्तांतरावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येऊ शकतात. तसेच मंत्रीमंडळ विस्तारदेखील अधिवेशनात चर्चेत राहण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्याने गेल्या मंत्रीमंडळात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता सत्तेचे चक्र फिरले आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांचाही समावेश मंत्रीमंडळात झाल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना धोरवर धरू शकतात. मुख्य म्हणजे, राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दादेखील यंदाच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide