आपला महाराष्ट्रराजकारण

मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सभांचा धडका लावला आहे. तसंच राज यांनी पक्षवाढीच्या हालचालींना देखील जोरदार सुरुवात केली आहे.

मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे येथील सभानंतर आता मनसेकडून उद्या मंबईत पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेकडून मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्या दुपारी 3 वाजता पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता मनसैनिकांना आहे. तसंच त्यांची पुढील भूमीका काय असणार याकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.