ब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

मनसे नेते अविनाश जाधव आयोध्येत दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे ठरवले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता.

राज ठाकरे उत्तर प्रदेशातील लोकांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या दौरा स्थगित केला आहे. मात्र त्यांनतरही मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत.