MLC ELECTION: मुंबई: महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 11 जगांसाठी आज मतदान होत असून 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्यानं मोठी चुरस निर्माण झाली असून महायुती व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 5 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात आहे.
कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार रिंगणात
भाजपा
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
- डॉ. परिणय फुके
- अमित गोरखे
- सदाभाऊ खोत
शिवसेना
- भावना गवळी
- कृपाल तुमाने
राष्ट्रवादी
- राजेश विटेकर
- शिवाजीराव गर्जे
काँग्रेस
- डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
- मिलिंद नार्वेकर
शेतकरी कामगार पक्ष
- जयंत पाटील