आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

सर्वोच्च न्यायालयातील सूनवणीपूर्वी आमदार रोहित पवारांचं सुचक ट्विट म्हणाले…..

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेच्या  याचिकेसह अन्य दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान या सुनावणीपूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी एक सूचक ट्विट केलं असून या ट्विट मध्ये रोहित पवार म्हणतात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.बंडखोर आमदारांचं काय होईल, सरकार कोसळेल की वाचेल यात सामान्य जनतेला रस नसून लोकशाही मूल्ये जपली जातील का?अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? संविधान टिकेल का? हे खरे प्रश्न असून त्याकडं सामान्य माणसाचं लक्ष आहेत.