कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे. या जागी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चंद्रकांत जाधवांच्या पत्नीवजयश्री जाधव निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. अनेक दिग्गज नेते या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत.
या निवडणुकीसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला असून लोकशाहीला समृद्ध बनण्यासाठी सर्व कोल्हापूर वासियांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाचा हक्क बजावला. या निर्भीड लोकशाहीला बळकट करण्यासाठी माझे सर्व बंधू-भगिनीना विशेषत: माझ्या तरुण मित्रांना आवाहन आहे की विक्रमी संख्येने मतदान करूया, लोकशाहीला समृद्ध बनवूया. pic.twitter.com/99ZfUrulNO
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 12, 2022