Medha Kulkarni : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील सर्व (Medha Kulkarni) आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणामध्ये आरोपींमध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांचा देखील समावेश होता. त्यांची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आज पुण्यातल्या निवासस्थानी त्यांचं आगमन झालं. पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं एवढंच नाही तर पुरोहित शोभायात्रेमध्ये सुद्धा सहभागी झाले होते.
Manoj Jarange : मोठी बातमी: मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात
भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी कर्नल पुरोहित यांच्या घरी जाऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. “द कश्मीर फाईल्स” प्रमाणे “द मालेगाव फाइल्स” हा सिनेमा काढायला हवा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या “द कश्मीर फाईल्स” सारखाच “द मालेगाव फाइल्स” हा सिनेमाही झाला पाहिजे. कारण काँग्रेसच्या काळात फेक नेटिव्ह पसरवले गेले होते. त्यांचं पितळ उघडं पाडण्यासाठी मालेगाव फाइल्स हा सिनेमा आहे आलाच पाहिजे असं मत खासदार कुलकर्णी यांनी व्यक्त केलं
*TOP NEWS MARATHI : मनोज जरांगे पाटील, असलेल्या लिफ्टला अपघात! काय घडलं? पाहा.. संपूर्ण व्हिडिओ
दरम्यान माध्यमांशी बोलताना पुरोहित यांनी सांगितलं की, माझ्या सोसायटीतल्या लोकांनी माझं चांगलं स्वागत केलं. मी इथे जन्मलो आणि वाढलो आहे ही सोसायटी माझ्यासाठी परिवार आहे. हे लोक माझ्या खूप दिवसांपासून मागे लागले होते की माझं कौतुक त्यांना करायचा आहे. पण केस संपल्याशिवाय मी सत्कार स्वीकारणार नाही असं सांगितलं होतं. हे या परिवाराचं माझ्यावरच प्रेम आहे असं म्हणत कर्नल पुरोहित यांनी आभार मानले.