बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी आज मोठी घोषणा केली. मायावती यांनी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केला आहे. त्यांचा उत्तराधिकारी दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा पुतण्या आकाश आनंद हे आहेत. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश आनंद हे आता पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. बसपाच्या बैठकीत मायावती यांनी आपला वारस म्हणून आकाश आनंद यांची घोषणा करत भविष्यात पक्षाची धुरा हे आकाश सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकी पूर्वी मायावती यांच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कोण आहे आकाश आनंद?
आकाश आनंद हे बसपा प्रमुख मायावती यांचे लहान भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. आकाशचे शालेय शिक्षण गुरुग्राममधून झाले. आकाश यांनी पुढील शिक्षण लंडनमध्ये केले. त्यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे. 2017 पासून ते पक्षात सक्रिय आहेत. यंदा ते मायावतींसोबत मोठ्या सभेत मंचावर दिसले. यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याविषयी चर्चा सुरू झाली. गेल्या सहा वर्षांपासून बसपामध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अनेक पावले उचलली. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक पद सांभाळत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या
Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री
Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू
Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न
Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत
IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना
Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी
Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर
Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू