Maratha Reservation Protest : अखेर सरकारकडून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य; आंदोलन घेणार मागे

106 0

Maratha Reservation Protest : राज्यसरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीच्या शिष्ट मंडळाने आज झालेल्या सुनावणी नंतर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी (Maratha Reservation Protest) त्यांनी मसुदा सादर केला, या मसुद्यातुन मराठा समाजाच्या मागायची काही अंशी पूर्तता होताना दिसते आहे. परंतु या वेळी हे आरक्षण ओबीसी मधून मिळणार कि नाही या बद्दल मात्र वाच्यता करण्यात आली नाहीये.

MANOJ JARANGE PATIL ANDOLAN| मराठा आंदोलक आणि पोलीस प्रशासनामध्ये बाचाबाची

राज्यसरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीच्या शिष्ट मंडळाच्या वतीने विखे पाटील, विजय सूर्यवंशी आणि सचिन गणेश पाटील यांनी भेट घेतली. मसुद्यातील मागण्यांचा जीआर सरकारने द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. आज रात्री ९ वाजे पर्यंत जीआर मिळाला तर आझाद मैदान खाली करणार असल्याचं मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं.

नेमक्या कोणत्या मागण्या मान्य

  • हैद्राबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करणार.
  • चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार.
  • सातारा संस्थांच्या गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा समावेश त्रुटी दूर करून १ महिन्यानी अंमलबजावणी.
  • ५८ लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत लावा मनोज जरंगे पाटील यांची मागणी
  • मराठा कुणबी एकच हे समजून घेण्यासाठी सरकारला २ महिन्यांची मुदत.
  • मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याबाबत जीआर काढण्याची जरांगे पाटलांची मागणी.
  • सगेसोयऱ्यांवर ८ लाख हरकत आहे त्यासाठी वेळ लागेल, त्या मागणीसाठी मुदत वाढ.
  • मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या उर्वरित कुटुंबियांना एक आठवड्यात आर्थिक मदत देणार.
  • आंदोलकांवरील प्रत्येकी ५ हजाराचा दंड मागे घेणार.

Supriya Sule At Azad Maidan : मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंविरोधात रोष, कार थांबवून घोषणाबाजी

वरील सर्व मागण्यांचा जीआर सरकारने द्यावा अशी मागणी जरांगे पाटील यांच्या कडून करण्यात आली आहे. अद्याप आंदोलन मागे घेण्यात आलेले नाही. आज रात्री ९ वाजे पर्यंत जीआर दिला तर मुंबई खाली करू. सरकारने दिलेल्या जीआर चा अभ्यास करू योग्य आहे कि नाही पडताळू आणि मगच मुंबई सोडू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!