MARATHA ARAKSHAN : आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की मनोज जरांगे पाटील ज्यांनी यापूर्वी 2023-2024 मध्ये मराठ्यांना आरक्षण (MARATHA ARAKSHAN) मिळावं म्हणून मोठी आंदोलनं केली होती. त्यावेळी नेमकं काय झालं की? आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलंय…चला जाणून घेऊया सविस्तर…
मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठीच्या लढ्याची सुरुवात ही 1980 (MARATHA ARAKSHAN) च्या दशकात झाली. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण संविधानिक नसल्याचं सांगून त्याला अवैध ठरवलं. त्यानंतर 2023 मध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या लढाईमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची एंट्री झाली. म्हणून जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी इथं 29 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात केली. हे आंदोलन खूप तीव्र झालं होतं यामध्ये अबालवृद्धांचा समावेश होता. यावेळी आंदोलकांवर लाठी चार्ज करण्यात आला होता. हा लाठीचार्ज तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून केल्याचा गंम्भीर आरोप जारांगे यांनी केला होता. ज्यावेळी देखील मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदणी तपासण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली. यावर ओबीसी नेते छगन भुजबळ, बबनराव तायवडे, लक्ष्मण पवार यांनी हरकत घेतली. तर दुसरीकडे जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम होते. मराठा व ओबीसीत असलेला कुणबी एकच असल्याने मनोज जरांगे व मराठा आरक्षण आंदोलन समितीचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात एकूण मराठा समाजापैकी 70 टक्के मराठ्यांची 1967 पूर्वीची नोंद कुणबी असल्यामुळे ते आधीच ओबीसीत दाखल आहेत. त्यातील 30 % मराठा ओबीसी आरक्षणातून सुटला आहे याच मराठ्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलन काम करत आहेत असं सांगण्यात आलं. आणि 14 ऑक्टोबर 2023 ला मराठ्यांचा रेकॉर्डब्रेक मेळावा अंतरावरील सराटी घेण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली. पुढे म्हणून जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू केले. पुढे जानेवारी 2024 पासून मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यात इतर जातींची ही माहिती घेण्यात आली. यासाठी 154 प्रश्नांची प्रश्नावली मराठा, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी आणि कुणबी व्यक्तींकडून घेण्यात आली. हे सर्व काही 31 जानेवारी 2024 पर्यंत चाललं. मुंबईकडे निघालेल्या मनोज जरागेंच्या आरक्षण यात्रेत मराठे तेव्हाही सामील होत गेले आणि शेवटी 25 जानेवारी 2024 ला लाखो मराठे नवी मुंबईतील दाखल झाले. त्यानंतर दोनच दिवसांत 27 जानेवारी 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यात आलं. जरांगेंच्या मागण्या मान्य करत कुणबी मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ यासाठी अध्यादेश जारी केला. इथे देखील पुन्हा छगन भुजबळ यांनी या अध्यादेशाला देखील तीव्र विरोध केला. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण तो अद्याप लागू झाला नाही तो लागू करावा अशी मनोज जरांगे आता यांनी केलीये. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मागणी अद्यापही मान्य झालेले नाही त्यामुळे त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलय. शिवाय मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत तसेच सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे- पाटील आणि मुंबईत थांबलेले आंदोलक ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला 24 तास धावणाऱ्या मुंबइच्या सामान्य नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा स्थितीत आरक्षणाच्या बाबतीत सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.