MANOJ JARANGE ON RAJ THACKERAY : “राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं” जरांगे पाटलांचा राज ठाकरेंवर घणाघाती प्रहार

88 0

MANOJ JARANGE ON RAJ THACKERAY : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस उगवल्यानंतर वातावरण आणखी तापलं आहे. आंदोलनाचे (MANOJ JARANGE ON RAJ THACKERAY) नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवला.

*TOP NEWS MARATHI HOTEL BHAGYASHREE MARATHA RESERVATION: हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं मराठा आंदोलकांसाठी पाठवलं शेकडो किलो अन्न

“राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं”

मनोज जरांगे म्हणाले, राज ठाकरे हे विनाकारण मराठा आंदोलनावर बोलतात. आम्ही कधीच त्यांच्या राजकीय हालचालींवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. मग त्यांनी आमच्याबाबत टीका करण्याचा हक्क कुठून आणला? मराठा समाजाच्या वेदना कमी करण्याऐवजी ते फक्त भाष्य करून समाजात गोंधळ माजवत आहेत. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं, हुरळून जाणारे, कुचक्या कानाचे माणूस आहेत, असे त्यांनी रोखठोक शब्दांत म्हटले.

पैशांच्या नावाने धंदा चालवू नका

आंदोलनात सहभागी होताना काहीजण समाजाच्या नावावर पैसे उकळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेनकोट, छत्र्या वाटण्याच्या नावाखाली पैसे मागितले जात आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांनी आता कोणालाही पैसे देऊ नयेत. गरीबाला मदत करा, पण आंदोलनाचं नाव घेऊन कोणी व्यवसाय करत असेल तर त्याला रोखा,” अशी जाहीर सूचना त्यांनी समाजबांधवांना केली.

MANOJ JARANGE : मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय : उपोषण अधिक तीव्र, उद्यापासून पाणीही बंद

“आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही”

आपली भूमिका ठाम करताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा तरुणांची मान खाली जाऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. कितीही अडचणी आल्या तरी आरक्षण मिळवल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका

राजकारणातील आणखी एका नेत्यावर थेट निशाणा साधत त्यांनी म्हटले, “चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून व्हॅलिडिटी प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. फार लांब नाहीत तुम्ही, कोल्हापुरातच आहात. सावध रहा.”

पुढील आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटलांच्या या वक्तव्यांनंतर आंदोलनाला आणखी तीव्र वळण मिळण्याची शक्यता आहे. एका बाजूला त्यांचे उपोषण कठोर होत आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांवर होत असलेले हल्ले आंदोलनाच्या राजकीय परिणामांची चिन्हे दाखवत आहेत.

Share This News
error: Content is protected !!