Manoj Jarange

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा यु – टर्न लोकसभेबद्दल केली ‘ही’ मोठी घोषणा

625 0

जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आवाहन केलं आहे. यापूर्वी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला होता. मात्र, त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली आहे.

मनोज जरांगेनी केली ‘ही’ मोठी घोषणा
यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. 30 एप्रिलपर्यंत या संदर्भात निर्णय घ्या, आढावा बैठका आयोजित करा आणि मला अहवाल द्या असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, आता अहवाल आल्यानंतर मनोज जरांगे पाटील निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा, अशी भूमिका जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीविषयी घेतली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

LokSabha : नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार! बारामतीमधून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

Govinda : गोविंदाचा पत्ता कट; उत्तर पश्चिम मतदार संघात दिसू शकते मराठमोळी अभिनेत्री?

Bharat Ratna Award : भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले ‘हे’ दिग्गज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते झाले वितरण

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

LokSabha : शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

Share This News
error: Content is protected !!