Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे आणि जनतेच्या मनात विशेष स्थान (Manoj Jarange) मिळवलेले नेते मनोज जरांगे पाटील आज एका धक्कादायक घटनेत थोडक्यात बचावले. बीड दौऱ्यावर असताना त्यांचा लिफ्ट अपघातात सापडल्याची घटना घडली असून यामुळे काही काळ सर्वत्र खळबळ माजली होती.
*TOP NEWS MARATHI : मनोज जरांगे पाटील, असलेल्या लिफ्टला अपघात! काय घडलं? पाहा.. संपूर्ण व्हिडिओ
बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये एका सहकाऱ्याला भेटण्यासाठी ते आले होते. यावेळी पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करताना, क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती लिफ्टमध्ये शिरल्याने तांत्रिक बिघाड झाला. अचानक लिफ्ट तुटून थेट जमिनीवर आदळली. हा प्रकार इतका अचानक घडला की उपस्थितांच्या हृदयाची धडधड वाढली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. लिफ्टचे दरवाजे जबरदस्त प्रयत्नानंतर उघडण्यात आले आणि त्यानंतर सर्वजण सुखरूप बाहेर आले.
घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त नेहमीच असतो, आणि यावेळीही सुरक्षारक्षक तत्परतेने पुढे सरसावले.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे जनतेचे आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष असते. त्यामुळे अशा अपघाताच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने ते आणि त्यांचे सहकारी धोक्यातून बचावले.