पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनदेखील पेटताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील सध्या महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला मंत्री छगन भुजबळांचा विरोध आहे. आज पुण्यातील खराडी या ठिकाणी मनोज जरांगे यांची सभा पार पडत आहे. या सभेदरम्यान त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच मी त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तसंच म्हातारा म्हणत, जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे. मराठ्याची आलेली सुनामी कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांची मुलं शेतातच राहिली. आरक्षण नसल्यानं ही मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. लेकरू अधिकारी होत नसल्यानं आई-बाप चिंतेत असतात. आम्ही नेमकं काय पाप केलं हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं, यासाठी लढा देतोय. पण याला विरोध होतोय. कितीही टक्के पडेल तरी पोर घरीच आहेत. त्यांना सध्या पोस्ट वर समाधान मानावं लागत आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
यादरम्यान मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन तुकोबा चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. या सरकारला आरक्षण देण्यासंबंधी सद्बुद्धी द्यावी, असं साकडं तुकोबा चरणी घातलं. हे सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या
Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू