ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा

गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे युवापिढीसाठी प्रेरणा असून देशाच्या जडणघडणीमध्ये मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं त्यावेळी मोदी बोलत होते. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमदार आशिष शेलार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.