Malegaon Sugar Factory Politics : माळेगाव साखर कारखान्याचं राजकारण तापलं; PDCC बँकत मध्यरात्री काय घडलं?

66 0

Malegaon Sugar Factory Politics : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजता देखील उघडी होती असा आरोप सहकार बचाव पॅनलकडून करण्यात (Malegaon Sugar Factory Politics) आल्यानं एकच खळबळ उडाली.. पाहुयात हे सगळं प्रकरण काय आहे.

Revati Nile suicide Case: मांत्रिकाच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण चांगलं असतं आपलं असून आता बारामतीतील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता उघडी होती असा आरोप करण्यात आलाय..याच PDCC बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला… रात्रीच्या 11 वाजता नेमकी ही PDCC बँक का? उघडी ठेवण्यात आली होती याचा सवाल सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते विचारत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात होता. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले.., उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्याठिकाणी होते. सुनील मुसळे यांचा बँकेत अकरा वाजता काय काम आहे, या ठिकाणी पैशाची पाकीट भरायची… हा उद्योग या ठिकाणी चालू होता, असा आरोप रंजन कुमार तावरे यांनी केला आहे. सभासदांना खरेदी करण्याचं काम सुरू आहे हे आम्ही कदापि चालू देणार नाही. आमची मागणी आहे याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे. सभासदाचे नाव त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि त्याची जबाबदारी कोणी घेतली? त्याचं देखील नाव आहे. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं देखील नाव आहे. त्यांची पीडीसीसी बँकेत काय जबाबदारी आहे? असा सवालही रंजन कुमार तावरे यांनी उपस्थित केला..

TOP NEWS MARATHI : बारामतीमधील PDCC बँक मध्यरात्री चालू का होती? खासदार सुप्रिया सुळे LIVE

या बाबतीमध्ये पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी ही स्पष्टीकरण दिलं…बँक साडेपाच वाजता बंद होते. मला फोन आला आणि त्यामुळे मी बँकेत आलो, रंजन काका आणि मी एकाच वेळी आलो. दुसऱ्या मजल्यावर संगणीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ती लोक बराच वेळ बसत असतात. मात्र या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या याद्या कशा सापडल्या हे मला सांगता येणार नाही, असं स्पष्टीकरण बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी दिलं आहे.

Share This News
error: Content is protected !!