विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

460 0

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल तीस जागांवर यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

विधानसभा निवडणूक ही तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसले असताना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी न मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीची स्थापना करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून तीनही पक्षांचे प्रमुख दोन प्रतिनिधी हे या समन्वय समितीमध्ये असणार असून अंतर्गत मतभेद टाळण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Share This News
error: Content is protected !!