बदलापूरच्या घटनेविरोधात 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापची लाट निर्माण झाली आहे.
या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे..