MLA'S EDUCATION : 288 आमदारांपैकी कोण किती शिकलंय? किती जण पाचवी पास? किती ग्रॅज्युएट आमदार?

MLA’S EDUCATION : 288 आमदारांपैकी कोण किती शिकलंय? किती जण पाचवी पास? किती ग्रॅज्युएट आमदार?

141 0

विधानसभेवर निवडून गेलेल्या विद्यमान आमदारांपैकी 65 जण ग्रॅज्युएट (GRADUATE) असून 39 जण पोस्ट ग्रॅज्युएट (POST- GRADUATE) आहेत. 02 जण लिहिता वाचता येणारे (साक्षर) असून 06 जण पाचवी, तर 20 जण आठवी पास आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association for democratic reforms) या संस्थेनं विद्यमान आमदारांच्या शैक्षणिक (MLA’S EDUCATION) पात्रतेबाबत तपशीलवार माहिती जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणूक निकालानुसार विजयी झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेविषयीची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन विजयी उमेदवारांचा शैक्षणिक तपशील उपलब्ध झाला नसल्यानं एकूण 288 पैकी 286 आमदारांची शैक्षणिक पात्रता यात नमूद करण्यात आली आहे.

65 ग्रॅज्युएट, 39 पोस्ट ग्रॅज्युएट, 07 पीएचडीधारक आमदार

विद्यमान आमदारांपैकी 65 जण ग्रॅज्युएट, 39 जण पोस्ट ग्रॅज्युएट, तर 07 पीएचडीधारक आहेत. यातील सर्वाधिक ग्रॅज्युएट आमदार भाजपचे असून त्यांची संख्या 30 आहे. सर्वाधिक पोस्ट ग्रॅज्युएट आमदार देखील भाजपचे असून त्यांची संख्या 18 आहे. एकूण 07 पीएचडीधारक आमदारांपैकी 03 आमदार भाजपचे आहेत.

54 प्रोफेशनल ग्रॅज्युएट, तर 14 डिप्लोमा होल्डर आमदार!

विद्यमान आमदारांपैकी 54 जण प्रोफेशनल ग्रॅज्युएट, तर 14 जण डिप्लोमा होल्डर आहेत. यातील सर्वाधिक प्रोफेशनल ग्रॅज्युएट आमदार भाजपचे असून त्यांची संख्या 54 आहे. सर्वाधिक डिप्लोमा होल्डर आमदार देखील भाजपचे असून त्यांची संख्या 06 आहे.

48 जण बारावी, तर 31 जण दहावी पास आमदार!

विद्यमान आमदारांपैकी 48 जण बारावी, तर 31 जण दहावी पास आहेत. यातील सर्वाधिक बारावी पास आमदार भाजपचे असून त्यांची संख्या 21 आहे. सर्वाधिक दहावी पास आमदार देखील भाजपचे असून त्यांची संख्या 16 आहे.

20 जण आठवी, तर 06 जण पाचवी पास आमदार!

विद्यमान आमदारांपैकी 20 जण आठवी, तर 06 जण पाचवी पास आहेत. यातील सर्वाधिक आठवी पास आमदार शिवसेनेचे असून त्यांची संख्या 08 आहे. सर्वाधिक पाचवी पास आमदार भाजपचे असून त्यांची संख्या 04 आहे.

लिहिता-वाचता येणारे (साक्षर) दोन आमदार!

विद्यमान आमदारांपैकी 02 जण लिहिता-वाचता येणारे (साक्षर) आहेत. यातील 01 जण भाजपचे, तर 01 जण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

25 वर्षांचा तरूण आमदार ते 77 वर्षांचे ज्येष्ठ आमदार!

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर. आर. पाटील हे 15 व्या विधानसभा निवडणुकीतील सर्वांत तरूण आमदार ठरले आहेत. त्यांचं वय 25 वर्षे असून ते ग्रॅज्युएट आहेत. 25 ते 35 वर्षे वयोगटातील 10 उमेदवार तरूण आमदार बनले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ हे 15 व्या विधानसभा निवडणुकीतील सर्वांत ज्येष्ठ आमदार ठरले आहेत. त्यांचं वय 77 वर्षे असून ते दहावी पास आहेत. 71 ते 77 वर्षे वयोगटातील 12 उमेदवार ज्येष्ठ आमदार बनले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!