Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

483 0

रायगड : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’हे नाव ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह दिले. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह वापरता येणार आहे. त्यामुळे आता हे चिन्ह जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी शरद पवार गटाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर ‘तुतारी’ या पक्ष चिन्हाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख आदी नेते उपस्थित होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरेदेखील उपस्थित होते. शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स अकाऊंवरुन या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. या कार्यक्रमाचा एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News
error: Content is protected !!