मुंबई : राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटताना (Maharashtra Politics) दिसून येत नाही. अनेक जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीतून शिवसेनेच्या नेत्यांनी आपली नाराजी उघड केली असल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विविध पक्षांतर्गत निर्णयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतून शिवसेनेतील नाराजांनी आपली खदखद व्यक्त केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागा भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पारड्यात जाऊ देणार नसल्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी मांडली. या बैठकीला शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. असमान जागावाटपामुळे आणि हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडाव्या लागत असल्यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. ‘रायगड, शिरूर, परभणी, धाराशिव या हक्काच्या जागा आपण मित्र पक्षाला सोडल्या. नाराजी असली तरीही त्यांचा प्रचार सुरू केला. आपण आपल्या परीने युती धर्म पाळत आहोत पण मित्रपक्ष तसे खरंच करत आहेत का ?’, असा प्रश्न शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरूनच शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे उघड होत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांनी जोमाने काम करा. आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे आपापसात संघर्ष न करता. युतीधर्म पाळूया. तसेच भाजप मोठा भाऊ असल्याने त्यांनी काही जागा जास्त लढवल्या तर काही फरक पडत नाही, अशा शब्दात शिवसैनिकांची समजूद काढल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपने आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या काही जागा स्वतःकडे घेतल्या. त्यामुळे शिवसेनेतील आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य शिवसैनिकही नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीचा फटका मताधिक्यावरही बसू शकतो. कदाचित जागा महायुतीच्या हातातून निसटू शकतात. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे नाशिक पालघर आणि संभाजीनगर या जागा काहीही झाले तरी मित्र पक्षांसाठी सोडायच्या नाहीत, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य
Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल
Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर
Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय