Jalna

Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा

351 0

जालना : जालना लोकसभा मतदारसंघातील (Maharashtra Politics) पळशी येथे आज भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमनेसामने आल्याने मोठा वाद झाल्याचे समोर आले. त्यांच्यात मोठी झटापटदेखील झाली. मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवे यांच्याशी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट होऊ दिली नाही यावरून चांगलाच राडा झाला. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रावसाहेब दानवे यांचा दौरा पळशी येथे असताना मराठा आंदोलक त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी वीस वर्षात काय केलं? असा प्रश्न उपस्थित करणार होते. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना रावसाहेब दानवे यांची भेट घेऊ दिली नाही. रावसाहेब दानवे यांची सभा झाल्यानंतर ते निघून गेले.

यामुळे मराठा कार्यकर्ते आणि रावसाहेब दानवे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते नेते यांच्यात चांगलीच जुंपली. यामुळे पळशीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होते. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!