महाविकास आघाडीचा आज महामोर्चा; थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात

272 0

महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे.

भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.

या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.

Share This News
error: Content is protected !!