BJP Logo

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

611 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections 2024) जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले आहेत. सध्या अमित शाह यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक सुरु आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यादरम्यान भाजपच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. महाराष्ट्रातून भाजप 32 जागा लढवण्यावर ठाम आहे, पण या 32 जागांपैकी काही जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांवर आग्रही आहे.

भाजप या जागा लढवणार?
1. पुणे : मुरलीधर मोहोळ.
2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदीप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
3. नांदेड – प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता.
4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवलं जाण्याची शक्यता.
6. नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
8. अकोला : संजय धोत्रे
9. इशान्य मुंबई : मनोज कोटक
10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.
14. माढा – रणजितसिंह निंबाळकर
15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.
16. भिवंडी : कपिल पाटील
17. सांगली : संजयकाका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करून लढू शकतात.
18. सातारा : उदयनराजे भोसले
19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टी नाना पाटील.
20. दिंडोरी : भारती पवार
21. रावेर : अमोल जावळे
22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय)
23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.
25: उत्तर मध्य मुंबई : पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.
26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे)
27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे (रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामांत लढण्यास इच्छुक आहेत )
28. दक्षिण मुंबई : राहुल नार्वेकर ( दक्षिण मध्य, दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली )
29. नांदेड : मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची. आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली )
30 . राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.
31. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे. सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.
32. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल. मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!