Prakash Ambedkar

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

808 0

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) बिगुल अखेर वाजलं आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे अशा पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 11 जणांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर, माढा, सातारा, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे.

वंचितचे दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार
हिंगोली – डॉ. बी.डी चव्हाण
लातूर – नरसिंह राव उदगीरकर
सोलापूर- राहुल काशीनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारसकर
सातारा – मारुती धोंडीराम जानकर
धुळे – अब्दूर रेहमान
हातकंणगले- दादागुड्डा पाटील
रावेर – संजय ब्राह्मणे
जालना – प्रभाकर भाकले
मुंबई उत्तर-मध्य अबूल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – काका जोशी

प्रकाश आंबेडकरांनी एकूण 19 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकंणगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!