Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना

628 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरु आहे. मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून या युतीबद्दल चर्चा होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी याबाबत विधाने केली होती. दरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील त्यांच्यासोबत असल्याचे समजत आहे.

उद्या सकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. भाजपच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळेदेखील रवाना झाले आहेत. या बैठकीत राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मनसे आता महायुतीमध्ये सहभागी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकाच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दुसऱ्यांदा दिल्ली वारी करत आहेत. त्यातच उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील भाजपच्या बैठकीसाठी दिल्लीतच आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपशी युतीची बातचीत करण्यासाठी दिल्लीत गेले असल्याची चर्चा होत आहे.बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!