MVA Loksabha Formula

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

568 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांसहीत वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली.

यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जागा वाटपाची घोषणा आम्ही थेट पत्रकार परिषदेमध्येच करु असं म्हटलं होतं. मात्र आता संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली असून यामध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणाच्या नावाची चर्चा सुरु आहे चला पाहुयात…

कल्याण – सुष्मा अंधारे किंवा आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
ठाणे – राजन विचारे (ठाकरे गट)
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (ठाकरे गट)
अकोला – प्रकाश आंबडेकर (वंचित बहुजन आघाडी)
शिरूर – अमोल कोल्हे (शरद पवार गट)
बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार गट)
जळगाव – हर्षल माने (ठाकरे गट)
रायगड – अनंत गीते (ठाकरे गट)
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत (ठाकरे गट)
मावळ – संजोग वाघेरे (ठाकरे गट)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (ठाकरे गट)
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील (ठाकरे गट)
रामटेक – रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे (काँग्रेस)
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)
नाशिक – विजय करंजकर (ठाकरे गट)
अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार गट)
अमरावती – बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले (काँग्रेस)
भंडारा – नाना पटोले (काँग्रेस)
पालघर – भारती कामडी (ठाकरे गट)
धाराशिव – ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट)
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख (ठाकरे गट)
हिंगोली – सचिन नाईक (काँग्रेस)
परभणी – संजय जाधव (ठाकरे गट)
जालना – शिवाजीराव चोथे (ठाकरे गट)
पुणे – रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
सांगली – विशाल पाटील (काँग्रेस)
भिवंडी – दयानंद चोरघे (काँग्रेस)
वर्धा – हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख (काँग्रेस)
नागपूर – अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे (काँग्रेस)
रावेर – एकनाथ खडसे (शरद पवार गट)
दिंडोरी – चिंतामण गावित (शरद पवार गट)
बीड – नरेंद्र काळे (शरद पवार गट)
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते (काँग्रेस)
नांदेड – आशा शिंदे (काँग्रेस)
काँग्रेस धुळे – तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर (काँग्रेस)
नंदुरबार – के सी पाडवी (काँग्रेस)

उमेदवार न ठरलेले मतदारसंघ
मुंबईची जागा काँग्रेससाठी सोडली असली तरी तिथला उमेदवार अजून ठरलेला नाही. तसेच लातूर मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!