Satara Loksabha

Satara Loksabha : शरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांनी सातारा लोकसभा लढवण्यास दिला नकार

548 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटलांकडून निवडणुक लढवण्यास नकार देण्यात आला आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र आहेत. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या जागी श्रीनिवास पाटील जिंकून आले होते. ह्यावेळेस देखील त्यांनाच उमेदवारी मिळेल असं निश्चित मानलं जात होतं. मात्र त्यांनी अचानक माघार घेतल्याने आता शरद पवार गटाचा साताऱ्यातून उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

83 वर्षीय श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत नकार दिला असल्याची माहिती दिली आहे. तब्येत बरी नसल्याने आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक नाही असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितले आहे. मात्र श्रीनिवास पाटील यांचा नकार कायम असल्यास शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना शरद पवार गटातून साताऱ्यामधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 20 दिवसांमध्ये सोडली नोकरी
शरद पवार 10 जून 1999 रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.त्यानंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये म्हणजेच 30 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या शरद पवारांच्या सांगण्यावरून श्रीनिवास पाटलांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ऑक्टोबर 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि कराड मतदारसंघाचे खासदार म्हणून जिंकून आले. 2004 साली ते दुसऱ्यांदा कराड मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत उतरले. 2004 मध्ये महाराष्ट्रातील सर्व खासदारांपैकी सर्वाधिक मताधिक्याने जिंकून जाणारे ते दुसऱ्या क्रमांकाचे खासदार ठरले होते. 2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. यानंतर ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर गेले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ

Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?

Pune News : पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते दमदार शुभारंभ

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News
error: Content is protected !!