मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा (Lok Sabha Elections) अद्याप सुटलेला नाही. आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ
मनसेला महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीत मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यावर एकमत झालं आहे.मात्र मनसे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मनसे कोणत्या चिन्हावर ही जागा लढवणार त्यावर आज दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्लीच्या बैठकीत झालेला निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कळवला जाणार आहे.
दरम्यान आज दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागा वाटपावर तोगडा निघाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.