Ajit Pawar

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

565 0

धाराशिव : लोकसभा (Loksabha) निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुतीकडून अनेक जांगावर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही जागांचा तिढा सुटलेला नाही. या जागांमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. मात्र आता धाराशिवचा तिढा सुटल्यात जमा आहे. ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवारी देण्यात येणार आहे.

अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशाला महायुतीमधूनच काही जणांचा विरोध होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश रखडला होता. अखेर आज अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त मिळाला आहे. आज दुपारी अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कणार आहेत. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळ या चिन्हावर धाराशिवची लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास धाराशिवमध्ये दीर आणि भवजईमध्ये हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे, धाराशिवची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेली असून, शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात अर्चना पाटील विरोधात ओमराजे निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Share This News
error: Content is protected !!