HEMANT SAWARA WIN: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं होतं. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या.
आताच हाती आलेल्या निकालानुसार पालघर मधून भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले आहेत. तर त्यांच्या विरुद्ध भारती कामडी यांना ठाकरे गटा कडून उमेदवारी देण्यात आली होती.