Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडं…’; शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांची मोहोळांवर टीका

672 0

पुणे : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर पुण्याचा राजकीय आखाडा तापला आहे. महायुतीकडून पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. आज रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला, शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांचं काम आहे. त्यामुळे शरद पवार यांना भेटून मार्गदर्शन घेतलं. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्या संदर्भात पवारांनी मार्गदर्शन केलं. शरद पवार यांची पुण्यात सभा होणार आहे. असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

मुरलीधर मोहोळांवर केली टीका
‘पैलवान हा सगळ्यांचा असतो, मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानाला दूध पाजले? त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले. त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडे वस्ताद आहे. बापटसाहेबांना मोहोळ यांनी किती त्रास दिला, किती छळलं हे सगळ्यांना माहिती आहे,’ असा हल्लाबोल धंगेकर यांनी केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात मोहोळ यांच्याविरोधात धंगेकर असा सामान रंगणार आहे. यामुळे आता या ठिकाणी महायुती बाजी मारते कि महाविकास आघाडी वरचढ ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!