पुरंदर : बारामती (Baramati Loksabha) लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील असं म्हटलं जात आहे. हि लढत खूप अटीतटीची होणार आहे. मात्र यादरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पवार काका-पुतण्यांचे जुने सहकारी विजय शिवतारे यांनी बारामतीत दोन पवारांविरुद्ध लढाईचे संकेत दिले.
काय म्हणाले विजय शिवतारे ?
विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील एका कार्यक्रमावेळी बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नसल्याचं म्हणत पवार कुटुंबियांवर हल्लाबोल केला. तसंच सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान होता असं शिवतारेंनी म्हटलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विराधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असल्याचा दावाही शिवतारे यांनी केला. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारेंनी दिला आहे.
कोण आहेत विजय शिवतारे ?
विजय शिवतारे हे 2008 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमद्ये होते. पण 2009 च्या विधानसभे आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत ते निवडणूक जिंकले. पण 2019 मध्ये शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी विजय शिवतारे यंदा आमदार कसा होतो ते मी पाहतोच असं म्हटलं होतं. यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराकडून शिवतारे पराभूत झाले होते. शिवतारे हे आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई झाली तर शिवतारेंच्या विरोधाचा फटका अजित पवार यांना बसण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!
ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात
Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश
Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा
Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू
Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा