Vasant More

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

639 0

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून (Vasant More) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी दौरे करत आहेत. पुण्यात गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक दौरे केले. तर पुणे शहराची जबाबदारी अमित ठाकरेंकडे सोपवली आहे. पुण्यात मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेही इच्छुक आहेत. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लोकसभेसाठी तयारीदेखील सुरु केली. मात्र नुकतीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली. या पोस्टवरून मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

काय लिहिले पोस्टमध्ये?
वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे. मनसेत यामुळे खळबळ उडाली असून पुण्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होते. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!