Congress

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

427 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची नावे आहेत. वाराणसीतून काँग्रेसने पुन्हा उत्तर प्रदेशचे उमेदवार अजय राय यांना नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. याशिवाय राजगडमधून दिग्विजय सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. ज्यामध्ये राजस्थानमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जयपूर ग्रामीणमधून अनिल चोप्रा, करौली-धोलपूरमधून भजनलाल जाटव आणि नागौरची जागा आरएलपीसोबत युतीसाठी सोडण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या 4 जागांवर उमेदवार जाहीर
रामटेक (राखीव एससी) : रश्मी श्यामकुमार बर्वे
नागपूर : विकास ठाकरे
भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत यादवराव पडोळे
गडचिरोली चिमूर : नामदेव किरसान

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!