काँग्रेस पक्षाची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून ‘या’ तेरा चेहऱ्यांना मिळाली संधी
विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून महाराष्ट्रात सोबतच झारखंड मध्ये ही विधानसभेची निवडणूक होणार आहे यासोबत विविध राज्यातील पोटनिवडणुका व नांदेड लोकसभेची पोट निवडणूक देखील होणार आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, रमेश चेन्नीथला आदी नेत्यांचा समावेश करण्यात आलाय.
यासोबतच महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रणिती शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, विश्वजीत कदम समावेश करण्यात आला आहे

