विधान परिषद निवडणूक: आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

263 0

मुंबई:- विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

निवडणुकीसाठी आजारी असतानाही भाजपाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता मतदान करण्यासाठी मुंबईत पोहचत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी देखील जगताप आणि टिळक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.आणि या निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

 

Share This News
error: Content is protected !!