विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरातील आज सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आज दिवसभर अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते.मोशी येथील सीजन बँकेवेट मध्ये दुपारी दोन वाजता घेणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि त्यानंतर चार वाजता पत्रकार परिषद असा अजित पवार यांचा दौरा होता मात्र आता हा दौरा रद्द झाला आहे.