लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात केले दाखल

LAL KRISHNA ADVANI ADMITTED TO HOSPITAL: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात केले दाखल

340 0

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (वय वर्ष 97) (lal krishna advani) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती केल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहे. वृद्धापकाळाने वारंवार त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. शुक्रवारी प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती ठीक नसल्याने ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न प्रदान करण्यात आला. तर लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडल्याने सर्वच पक्षाचे राजकीय नेते त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींनी घेतली होती भेट

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा 8 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांचा निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे विचारपूस देखील केली. या भेटीचा फोटो देखील पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केला होता.

हेही वाचा

SHIVAJI MAHARAJ STATUE AT RAJKOT: राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारला जाणार शिवरायांचा पुतळा; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारणाऱ्या शिल्पकारांना दिली जबाबदारी 

https://www.topnewsmarathi.com/politics/chhatrapati-shivaji-maharajs-statue-to-be-re-erected-at-rajkot-fort/#google_vignette

MINISTERS IN PUNE: पुणे जिल्ह्याला मिळणार तब्बल “इतकी” मंत्रिपदं; कुणाकुणाची नावं चर्चेत ? वाचा सविस्तर 

https://www.topnewsmarathi.com/politics/seven-to-eight-mlas-from-pune-are-likely-to-get-ministerial-posts-in-devendra-fadnaviss-cabinet/

PUNE CRIME: ‘मी नगरसेवक आहे, मला तू आवडतेस’, असं म्हणत पुण्यातील महिलेचा विनयभंग

https://www.topnewsmarathi.com/crime/a-man-in-pune-molested-a-woman-by-saying-i-am-a-corporate-at-vadgaon-sheri-and-i-like-you/

Share This News
error: Content is protected !!