Breaking News
Kiran Mane

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

926 0

मुंबई : राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. अखेर त्यावर आज शिक्कमोर्तब झाले. त्यांनी आज शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला.

किरण माने यांच्यासह बीड येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”बीडच्या निर्भिड शिवसैनिकांनो स्वागत. बीडकडे युतीमुळे आणि मुंडे साहेबांमुळे दुर्लक्ष झालं होतं. मात्र आता पालवी फुटत आहे. त्याचं आता वृक्ष होत आहे. मी लवकरच बीड जिल्ह्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी बीडमध्ये एक मोर्चा झाला होता. आता शेतकऱ्यांसाठीदेखील एक मोर्चा करणार आहे. तुम्ही नियोजन करा मी येणार. बीड मला पूर्णपणे शिवसेनामय करुन हवं”.

किरण माने कोण आहेत?
किरण माने हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ‘सातारचा बच्चन’ अशी त्यांची ओळख आहे. ‘सिंधुताई माझी माई’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे किरण माने घराघरांत पोहोचले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Share This News
error: Content is protected !!