कोल्हापूर- ‘धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यांना पुढे निवडणुकांमध्ये मोठ्या अडचणी येणार आहे’ असे खळबळजनक वक्तव्य करुणा मुंडे यांनी करून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज करुणा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या नावाबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्याकडे सर्व पुरावे असून अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करुणा मुंडे म्हणाल्या, ” माझ्याकडे जे पेपर आहेत त्याच्या आधारावरच मी फॉर्म भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही त्रुटी नाहीत. टेक्निकल प्रॉब्लेम तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. माझ्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जगाला हे पुरावे दिसतीलच, असं त्यांनी म्हटलं.
“आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून त्यातून अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात 25 वर्षाची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्यांसह लग्नाचे फोटो देखील असतील. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झालं आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक असेल” यापूर्वी करुणा मुंडे यांनी आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य केले होते.
कोण आहेत करुणा मुंडे ?
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंज मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे त्यांनी म्हटलं होते. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचे मान्य केले होते. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचे त्यांनी कबूल केलेले नाही.