revanna

Karnataka Election Result 2024 : देशातील पहिला निकाल जाहीर; प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

239 0

कर्नाटक : देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. हासन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 25 वर्षांनंतर विजय मिळवलेला आहे. हासन मतदार संघामध्ये वर्चस्व असलेल्या जेडीएससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे (JDS) हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा 2976 व्हिडीओ व्हायरल झाले होते. 2019 साली ते निवडणुकीसाठी उभे राहिले होते मात्र भाजपच्या मंजू ए यांचा पराभव करत विजय मिळवला होता. प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय वारसाही मोठा असून प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या देखील आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide